आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात पत्नी, आईवर चाकुने वार करुन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, पत्नी जागीच ठार, दोघे गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - येथील वराडे गावामध्ये अंगावर शहारे आणणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. सागर घोडरपडे नावाच्या व्यक्तीने त्याच्या आई आणि पत्नीवर चाकूने वार केले. त्यानंतर त्याने स्वतःला संपवण्यासाठी स्वतःवरही चाकुने अनेक वार केले. या घटनेमध्ये आरोपी सागर घोरपडे याची पत्नी जागीच मृत पावली तर सागरसह त्याची आई गंभीर जखमी आहे. 


सागरने हे पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण होते, हे अद्याप समजू शकलेले नाहीत. मात्र काहीतरी प्रचंड रागातून अशी घटना घडली असल्याची चर्चा व्यक्त करण्यात येत आहे. सागर घोरपडे याने चाकुने वार केल्याने त्याच्यासह त्याची आई आणि पत्नीही गंभीर जखमी झाले. त्यात सागरची पत्नी मोहिनी हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सागर आणि त्याच्या आईवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...