आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर-गारगोटी एसटी बसला शॉर्टसर्किटमुळे आग, सर्व प्रवासी सुखरुप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर- शहराच्‍या मध्‍यवर्ती बसस्‍थानकावरुन गारगोटी येथे जात असलेल्‍या एसटी बसला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आज सकाळी हणबरवाडीजवळ ही घटना घडली. सुदैवाने वेळीच बसचालकाने बस थांबवल्‍याने सर्व प्रवासी सुरक्षितरीत्‍या खाली उतरले. मात्र या धावपळीत काहीजण किरकोळ जखमी झाले. भांबावलेल्‍या चालकाने बस न्‍यूट्रल केल्‍याने नंतर ती रस्त्याकडेला असणाऱ्या नाल्यात गेली. त्याचवेळी आग भडकल्याने बस जळून पूर्णपणे खाक झाली. प्रथम चालकाच्या बाजूला असलेल्या बॉनेट मध्ये आग लागली, अशी माहिती आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...