आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात महा‘याेग’ : सांगलीत तीन, पुण्यात एका विश्वविक्रमाची नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- जत तालुक्यातील बालगाव येथे जिल्हा प्रशासन व गुरू देवाश्रम बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐतिहासिक योग शिबिरात सुमारे १ लाख १० हजार योगप्रेमींनी सहभाग घेतला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद जागतिक मान्यताप्राप्त ‘एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’,  ‘मार्व्हलस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या तीन ठिकाणी झालीे. सर्वाधिक लोकांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार योग साधना करण्याचा हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. विक्रमासंदर्भातील प्रमाणपत्र व सुवर्णपदक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.   


‘लिम्का’साठी प्रस्ताव
जागतिक लिम्का बुक विक्रमासाठी या संबंधीत प्रस्ताव पाठवण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या नियमानुसार अाणखी एका विश्वविक्रमाची नाेंंद हाेईल.  या उपक्रमासाठी गावातील शिक्षक, स्वयंसेवक व विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनीमेहनत घेतली, , अशी माहिती जिल्हाधिकारी वि.ना. काळम यांनी दिली.  


खुशीचा सर्वाधिक काळ पाण्याखाली योगा
सर्वाधिक काळ पाण्याखाली योगा करण्याचा विक्रम खुशी परमार या सोळा वर्षांच्या मुलीने गुरुवारी केला. २१० बारचा ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेत खुशी पाण्यात उतरली आणि तब्बल तीन तास सात मिनिटे २४ सेकंद तिने अंडरवॉटर योगा सादर करत नव्या विक्रमाची नाेंद केली. केला. या दरम्यान ४० योगासनांच्या दोन सायकल्स (८० योगासने) तिने पूर्ण केल्या आणि त्याही फक्त दीडशे बार अाॅक्सिजन सिलेंडर वापरून... खुशीच्या या विक्रमाची नोंद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...