आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aba Don\'t Make OwnSelf As Poor Person Gopinath Munde

आबा, तुमचा वाल्या होऊ देऊ नका, मुंडेंचा आर.आर.पाटील यांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली महापालिका निवडणुकीत राष्‍ट्रवादीने अनेक गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे. या वाल्यांचा वाल्मीकी करायला निघालेले गृहमंत्री आर.आर.पाटील कोणाकोणाला वाल्मीकी करणार आहेत. मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षातच अनेक ‘वाली’ आहेत. त्यांचा आबांना वाल्मीकी करता आला नाही. या लोकांच्या संगतीत राहून स्वत:चाच वाल्या होऊ देऊ नका, असा टोला भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी आबांना लगावला.


महापालिका निवडणुकीतील स्वाभिमानी विकास आघाडीच्या प्रचारार्थ सांगलीत आले असता मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीने भ्रष्ट मंत्र्यांना हटवण्याचे केवळ नाटक केले. राज्याच्या मंत्रिमंडळात आजही अनेक भ्रष्ट मंत्री आहेत. अजित पवारांपासून जयंत पाटलांपर्यंत ही यादी आहे. आर.आर. पाटील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. त्यांना ते बदलू शकले नाहीत. आता महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीने दिलेल्या गुन्हेगार उमेदवारांचा वाल्याचा वाल्मीकी करण्याचा विडा त्यांनी उचललाय, पण या वाल्यांचा वाल्मीकी करता करता ते स्वत:च वाल्या होऊ नयेत, म्हणजे मिळवले,’ असा टोलाही मुंडे यांनी लगावला. राज्यात युतीची सत्ता आल्यावर एलबीटी रद्द करू, अशी घोषणाही त्यांनी केली.