आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा : बसची वाट पाहात असलेल्या प्रवाशांवर आदळला कंटेनर, आठ जण जागीच ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - एसटीची वाट पाहात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर कंटेनर उलटल्याने आठ जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावर सातारा जिल्ह्यातील पारगाव- खंडाळा बसस्थानकाजवळ रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. मृतांत दोन पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे. अवजड कंटेनर क्रेनच्या साह्याने दूर करून मृतदेह बाहेर काढावे लागले. कंटेनर चालक नवनाथ आदिनाथ गीते (रा. पनवेल) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साखरेची वाहतूक करणारा कंटेनर (एमएच06-एक्यू 9314) सातार्‍याहून पुण्याकडे जात होता. बंगळुरू महामार्गावरील पारगाव- खंडाळा येथील बसस्थानकासमोरील पुलावरून कंटेनर जाताना त्याला ओव्हरटेक करून बस पुढे गेली. रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव कंटेनरचे चाक छोट्या पुलावरील दुभाजकाच्या कठड्यावर गेले. त्यामुळे पूल संपताच हे चाक पुन्हा रस्त्यावर येताना वाहन कोलमडले व भरधाव कंटेनर नियंत्रणात आणणे चालकाला शक्य झाले नाही. याच पुलाजवळ बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी वाहनांची वाट पाहात उभे होते. काही कळायच्या आत अवजड कंटेनर या प्रवाशांच्या अंगावर कोसळला. यात आठ जण जागीच ठार झाले, तर प्रसंगावधान राखून व जीव मुठीत घेऊन काही जण सुरक्षित ठिकाणी पळाल्याने ते बचावले.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाची छायाचित्रे