आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL: पोलिसांच्या ताब्यातील पिस्तूल पानसरेंच्या हत्येत आलेच कसे, समीरच्या वकीलांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात पोलिसांनी बनाव केला असल्याचा आरोप हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष आणि समीर गायकवाड याचे वकील अॅड.वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी divyamarathi.com सोबत  बोलतांना केला आहे. डॉ.दाभोळकर आणि कॉ.पानसरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार एकच असल्याचा अहवाल बंगळुरु फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. दाभोलकरांच्या हत्येमध्ये वापरलेले पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात होते, तर मग ते कॉ.पानसरे यांच्या हत्येसाठी कसे काय वापरण्यात आले? असा सवाल अॅड. इचलकरंजीकर यांनी उपस्थित केला आहे. जर पोलिसांच्या ताब्यातील पिस्तूलच दुसऱ्या गुन्ह्यात वापरले गेले असेल तर मग यात एखाद्या पोलिस अधिकाऱ्याचा हात आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत असल्याचे अॅड. इचलकरंजीकर म्हणाले. पोलिसांच्या ताब्यातील पिस्तूल बाहेर कसे येऊ शकते, या दृष्टीने सीबीआयने तपास का केला नाही यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.  या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जूनला होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 अॅड. इचलकरंजीकरांनी उपस्थित केले प्रश्न...
 - पोलिसांच्या मते डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील पिस्तुल कॉ. पानसरे हत्या प्रकरणात वापरण्यात आले. तसा अहवाल बंगळुरु फॉरेन्सिक लॅबने दिला आहे. मात्र डॉ. दाभोलकर यांची हत्या 2013 मध्ये झाली.
 
- तज्ञांनी दिलेल्या अहवालात डॉ. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात दोन वेगवेगळी पिस्तुल वापरल्याचा उल्लेख केला आहे. यातीलच दुसरे पिस्तुल कलबुर्गी यांच्या हत्येसाठी कर्नाटकात वापरण्यात आले आहे. मग आता प्रश्न उरतो तो पोलिसांच्या ताब्यात पिस्तुल असतांना कॉ. पानसरे यांचा खून होतोच कसा ? असा सवाल अॅड. इचलकरंजीकर यांनी केला आहे. 
 
- या प्रकरणाचा तपास करणारे अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना सनातनच्या आश्रमावर धाड घालून औषधे पडताळायला वेळ आहे. मात्र कॉ. पानसरे प्रकरणातील पिस्तूल कोणते होते, याचा तपास मात्र त्यांना करता येत नाही का? असा प्रश्‍न अॅड.वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उपस्थित केला.
 
 - विशेष गुन्हे अन्वेषण पथकाने तपासाचे कारण देऊन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथर्व शिंदे या विद्यार्थ्याच्या जबाबानुसार कॉ. पानसरे यांच्यावर समीर गायकवाडने गोळ्या झाडल्याचे आरोप न्यायालयात केल्याने त्याचा दोन वेळा जामीन नाकारण्यात आला होता.
 
- सनातनचा साधक वैद्य वीरेंद्र तावडे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात दाखल केलेल्या दुसर्‍या आरोपपत्रात पोलिसांनी सनातनचे फरारी साधक विनय पवार आणि सारंग अकोलकर (कुलकर्णी) यांच्यावर संशयाची सुई धरून त्यांनी कॉ. पानसरे यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
 
-  वास्तविक पोलिसांनी या दोघांची नावे घेतल्यामुळे समीर याचे नाव येथे येत नाही. त्यामुळे त्याला विनाकारण कारागृहात का ठेवण्यात आले आहे? त्याची त्वरित जामिनावर सुटका करावी अशी मागणी त्यांनी केली.
 
-  कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील पोलिसांनी पंचनामा करून जप्त केलेली काडतुसे आणि रिकाम्या पुंगळ्या स्कॉटलंड यार्डच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठविल्याचे तपास यंत्रणेकडून सांगितले जात होते. पण त्या पाठविलेल्या नाहीत.
 
- हा मुद्देमाल त्यांनी गुजरातला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल सीबीआयला (केंद्रीय गुन्हे अन्वेषण)  दिल्यानंतर पोलिसांनी हा मुद्देमाल स्कॉटलंड यार्डला पाठवल्याचे कारण उच्च न्यायालयात सांगून सतत या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली आहे.
 
- यामध्ये पोलिसांनी खोटारडेपणा केल्याचे स्पष्ट दिसून येते. असा आरोप अॅड.वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...