आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Ritesh Deshmukh Fine Hundred Rupees For Black Glass

रितेश देशमुखला शंभर रुपये दंड!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - बीएमडब्ल्यू कारच्या काचांना काळी फिल्म लावून फिरणारा अभिनेता रितेश देशमुखला सातार्‍यात पोलिसांनी गुरुवारी रात्री शंभर रुपये दंड ठोठावला तसेच त्याच्या कारला लावलेल्या सुमारे दोन लाख रुपयांच्या काळ्या फिल्मही उतरवल्या. चालकाने उद्दामपणे उत्तर दिल्याने रितेशला ही शिक्षा भोगावी लागली, हे विशेष.
सातारा जिल्ह्यातील कास पठार भागात रितेशचे चित्रीकरण सुरू आहे. त्याला भेटण्यासाठी गुरुवारी ‘इंडियन व्हीजन 2020’चे सदस्य पंकज कुंभार गेले होते. त्यांनी रितेशला मानवाधिकार कायद्याचे पुस्तक भेट दिले. कुंभार यांना त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीच्या काचा जास्तच काळ्या वाटल्या त्यामुळे त्यांनी चालकाला याबाबत विचारले. त्यावर ‘आम्ही देशभर फिरतो, पण असे कोणी विचारले नाही, आम्हाला कोणी अडवू शकत नाही,’ असे उद्दाम भाषेत चालकाने उत्तर दिले. त्यावर कुंभार यांनी पोलिस अधीक्षक प्रसन्ना यांना एसएमएस पाठवून वस्तुस्थिती कळवली. त्यावर प्रसन्ना यांनी वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना कारवाईचे आदेश दिले. रितेश महाराजा हॉटेलमध्ये उतरला होता. वाहतूक निरीक्षक तिथे गेले असता तो बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. रात्री रितेश परतल्यावर त्यांना काळ्या काचांबाबत नियम सांगण्यात आला. त्यावर आपली चूक माफ करत रितेशने दंडाची रक्कम भरली.