आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला उर्फ उमादेवी नाडगौडा यांचे (वय ८३) निधन झाले. रविवारी दुपारी पंचगंगा स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. १७ नोव्हेंबर १९३२ रोजी जन्मलेल्या शकुंतला यांनी सहाव्या वर्षी प्रभातच्या ‘दहा वाजता’ या चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले होते. आजवर त्यांनी मराठी आणि हिंदी अशा एकूण ६० चित्रपटांमध्ये काम केले. भालजी पेंढारकर, अनंत माने, दिनकर पाटील या मराठी दिग्दर्शकांच्या तर विमल रॉय, बी. आर. चोप्रा या दिग्गज हिंदी दिग्दर्शकांसोबत काम करण्याची त्यांनी संधी मिळाली. रामशास्त्री, शारदा, मायाबाजार, चिमणी पाखरे, मायबहिणी, अबोली, सौभाग्य या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.