आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदर्शमध्ये कोल्हापुरातील दोन शिक्षकांच्या सदनिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - आदर्श घोटाळ्याच्या अनेक रहस्यमय कथा अजूनही उजेडात येत असून कोल्हापूर शहरातील विद्यापीठ हायस्कूल या जुन्या शाळेतील दोन शिक्षकांच्या सदनिका आदर्श सोसायटीमध्ये असल्याचे उघडकीस आले आहे. मुळात या दोन शिक्षकांकडे 50 लाख भरण्याएवढे पैसे आले कुठून या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
विद्यापीठ हायस्कूलमधील निवृत्त शिक्षक विश्वास चौगुले आणि आर. एम. भोसले या दोघांच्या सदनिका आदर्शमध्ये असल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील नामांकित आणि जुनी शिक्षण संस्था म्हणून विद्यापीठ शिक्षण संस्थेकडे पाहिले जाते. याच शाळेतील भोसले यांनी या सोसायटीमध्ये सदनिका घेतली आहे. तर त्यांच्याच सहकार्यामुळे चौगुले यांना येथे सदनिका मिळाला आहे.
आपल्याला लागणारे 38 लाख रुपये विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश शिंदे यांनी दिले, तर भोसले यांचे मित्र रघुनाथ गाडे यांनी साडे तेरा लाख दिल्याचे चौगुले सांगत आहेत. मुळात या दोन माध्यमिक शिक्षकांनी 52 लाख रुपयांची सदनिका घेण्याचे धाडसच कुणाच्या जिवावर केले याबाबत आता तपास सुरू होण्याची शक्यता आहे.