आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adv.Udaysingh Patil Give Seven Days Police Custody At Satara

पाटील खूनप्रकरणी आमदारपुत्राला सात दिवसांची कोठडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- ‘महाराष्ट्र केसरी’ संजय पाटील यांच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला अँड. उदयसिंह पाटील याला स्थानिक न्यायालयाने गुरुवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उदयसिंह हा दक्षिण कराडचे आमदार विलास पाटील-उंडाळकर यांचा मुलगा आहे. उदयसिंहने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तो राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने या खटल्यात सहकार्य करण्यास कोणीही पुढे येत नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे न्यायालयाने अटकपूर्व जामिनाची विनंती फेटाळत उदयसिंह याला ताब्यात घेण्याचे आदेश बुधवारी दिले होते. त्यानुसार रात्रीच त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची कोठडी सुनावली.