आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Advocate Agitating For The High Court Bench In Kolhapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडपीठासाठी वकिलांचे कोल्हापुरात काम बंद आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील वकिलांनी गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. शहरातील जिल्हा न्यायालयाबाहेर धरणे धरत वकिलांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधले.


कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी गेली 25 वर्षे लढा सुरू आहे. मात्र, पुणे व सोलापूर जिल्ह्यांनीही खंडपीठासाठी आग्रही मागणी सुरू केली आहे. त्यामुळे वरील सहाही जिल्ह्यातील वकिलांनी कोल्हापूरचाच आग्रह धरत आंदोलनाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच या जिल्ह्यातील वकिलांनी कोल्हापुराला बैठक घेऊन आंदोलनाचा इशारा दिला तसेच
कृती समितीची स्थापना केली होती.


सांगलीत मोर्चा, निदर्शने
कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी सांगलीतील वकिलांनी गुरुवारी काम बंद आंदोलन करत मोर्चा काढला. ‘कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील वकिलांनी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, गृहराज्यमंत्री, वनमंत्री, ग्रामणविकास मंत्री या भागाचे नेतृत्व करत असतानाही या मागणीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले’, असा आरोप बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी केला. मोर्चात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते. नंतर गांधी पुतळ्यापर्यंत
निदर्शने करण्यात आली.