आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सबनीस, तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला; 'सनातन'च्या वकीलांचे ट्विट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना सनातनचे वकील अॅड. संजीव पुनाळकर यांनी ‘तुम्ही मार्निंग वॉकला जात चला, श्रीपाल सबनीस’ असे धमकीवजा ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली.

पुनाळकर यांनी १२ डिसेंबरला कोल्हापूर पोलिसांना पत्र लिहून गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील प्रत्यक्षदर्शी शाळकरी मुलाच्या जीविताबाबत काळजी व्यक्त करतानाच त्यांनी सलमान खान प्रकरणातील रवी पाटील यांची अवस्था काय झाली याचा संदर्भ देत अप्रत्यक्ष इशाराही दिला होता. हे प्रकरण उघडकीस येऊन दोन दिवसही होत नाहीत तोच पुनाळकर सबनीसांसाठी केलेल्या धमकीवजा व्टिटने पुन्हा चर्चेत आलेआहेत. त्यांनी सबनीसांन सकाळी फिरायला जात चला, असा सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मॉर्निंग वॉकला गेल्यावरच नरेंद्र दाभोळकर, पानसरे यांच्या हत्त्या झाल्या आहेत. घरातच असली तरी याच वेळेत कलबुर्गी यांची हत्त्या झाली आहेत. या सगळ्याचा संदर्भ या टि्वटमागे असल्याने सनातनकडूनच हा अप्रत्यक्ष इशारा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हा तर सबनीस यांना सल्ला
गेल्या काही दिवसांमध्ये सबनीस हे काहीही बोलत आहेत. अतिशय रागीट पध्दतीने त्यांचे बोलणे आहे. ते म्हणतात की मी ज्या भागातील आहे तिथली भाषाच अशी आहे. मी ही मालवणचा आहे. माझी भाषा कोकणी आहे. तब्येत बरी नसेल तर सकाळी फिरायला जात जा अशा अर्थाने मी सबनीसांना सल्ला दिलेला आहे. त्याचा कुणी कायअर्थ काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे पुनाळकर यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...