आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारमंत्र्यांच्या घरावर ६ जून रोजी मुश्रीफ यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची धूळधाण उडाली असून याचा जाब विचारण्यासाठी ६ जून रोजी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर हजारोंचा मोर्चा नेण्याचा निर्णय कोल्हापूर राष्ट्रवादीने घेतला आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीला नूतन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. २००० कोटी रुपये कारखान्यांना देण्याचा निर्णय झाला तरी एक दमडी देखील अजून मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. साखर उद्योग अडचणीत आला असताना सरकारने तातडीने कोणतीही पावले उचलली नाहीत असा आरोप या वेळी करण्यात आला.

सहकारमंत्र्यांच्या घराशेजारील मैलखड्डा परिहरात सकाळी १० वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते एकत्र येणार असून तेथून ते मोर्चाने जाणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...