आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिसांच्या क्रेन सुरु झाल्याने स्वाभिमान, प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे धरणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक नियंत्रक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करताना कार्यकर्ते. - Divya Marathi
वाहतूक नियंत्रक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करताना कार्यकर्ते.
कोल्हापूर- पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक शाखेच्या पोलिसांच्या बनावट पावत्यांचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर 25 दिवस वाहने उचलणाऱ्या क्रेन बंद ठेवण्यात आल्या. काही दिवसापासून या क्रेन पुन्हा सुरु करून वाहनधारकांना त्रास देणे सुरु करण्यात आल्याने स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष सचिन तोडकर आणि प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक नियंत्रक पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.
 
आज सकाळी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई करवीर पोलिस ठाण्याच्यासमोर आपली दुचाकी लावून आपल्या कामानिमित्त कार्यालयात गेले होते. त्याच दरम्यान वाहतूक नियंत्रक शाखेची क्रेन तेथे आली आणि तेथील कायदेशीर पार्किगमध्ये लावण्यात आलेली वाहने उचलून घेऊन गेली. त्यामध्ये दिलीप देसाई यांचे वाहनसुद्धा होते. त्यांच्या दुचाकीत अनेक बड्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली आणि कागदपत्रे असल्याने ते अस्वस्थ झाले. क्रेनने वाहन उचलून नेल्याचे त्यांना समजल्यानंतर थेट वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस ठाण्यात देसाई आले असता त्यांना तेथे जवळपास दीडशेहून अधिक वाहनधारक आपली वाहने सोडवण्यासाठी आल्याचे दिसून आले. 300 रुपयांची पावती केल्याशिवाय वाहन सोडले जात नव्हते त्यामुळे संतप्त देसाई यांनी ही बाब स्वाभिमान संघटनेच्या सचिन तोडकर यांना कळवली.
 
स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांसह आलेल्या तोडकर यांनी वाहतूक पोलिसांच्या भ्रष्ट्राचाराचा धिक्कार करत पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच ठाण मांडले. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ त्याठिकाणी आले आणि त्यांनी  आंदोलन न करता चर्चा करून हा प्रश्न मिटवू असे सांगून कार्यकर्त्यांना तेथून बाजूला केले. काही दिवसापूर्वी 'दिव्य मराठी'ने वाहतूक पोलिसांच्या बनावट पावत्यांचा भ्रष्ट्राचार चक्क पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ड्रेनेजच्या मॅनहोल मधून बाहेर काढला होता. त्यामुळे 3 पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु होती. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. तरीही 25 दिवस बंद ठेवण्यात आलेल्या क्रेन काही दिवसापासून पुन्हा सुरु करण्यात आल्या होत्या.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...