आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जनता दूधखुळी नाही, भाजप-शिवसेनेला त्यांची जागा दाखवेल; अजित पवार यांचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा/पुणे- 'भाजप आणि शिवसेनेला मतदार जागा दाखवतील. जनता आता दूधखुळी राहिलेली नाही’, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कराड येथे सरकारवर टीका केली.

 

शिवसेनेची दुटप्पी भूमिका 

‘शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. सत्तेत बसायचे, सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे विरोध करायचा आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण जनता काही दूधखुळी नाही. जनतेला काही समजत नाही असे काही समजण्याचे कारण नाही. जनता हुशार आहे. आम्ही कसं वागतो, काय बोलतो याकडे बारकाईने लक्ष देते. त्यामुळे निवडणुकीत कुठं बटण दाबायचं तिथे ते बरोबर दाबतात. शिवसेनेला सत्तेची ऊबही हवी आहे आणि विरोधकांची स्पेसही हवी आहे. सगळंच आधाशासारखं घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.’ अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त चव्हाणांच्या स्मृतीस्थळांचे सत्ताधाऱ्यांसह अनेक नेत्यांनी दर्शन घेतले. यावेळी अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना आणि भाजपच्या धोरणावर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...