आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan In Belgaum

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी नाट्यसंमेलनावर कन्नडिगांची रझाकारी, तब्बल २० अटी लादून परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - बेळगावच्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला कर्नाटक प्रशासनाने तब्बल २० अटी घालून परवानगी दिली. संमेलनात सीमाप्रश्नाबाबत ठराव न करणे, त्या संदर्भाने कलाकृती सादर न करणे या अटींचा त्यात समावेश आहे. संमेलनाचे अधिकृत उद्‌घाटन शनिवारी सकाळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे.

गुरुवारी रात्री नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अन्य पदाधिकार्‍यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या हातात या २० अटींचा कागद ठेवण्यात आला. अनेक अडचणींचा सामना करत बेळगावकर या संमेलनासाठी सज्ज झाले असताना कर्नाटक प्रशासनाने मात्र पुन्हा आडमुठी भूमिका घेतली आहे. आता संयोजक कसा मार्ग काढतात, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.