आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan Ghashiram Kotwal

‘घाशीराम’ला उत्स्फूर्त दाद, 92 व्या नाट्य संमेलनाचा उघडला पडदा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - ‘घाशीराम कोतवाल’ या प्रसिद्ध नाटकाच्या प्रयोगाने गुरुवारी रात्री 92 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा पडदा उघडला. या प्रयोगास रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोघे, मावळते अध्यक्ष राम जाधव आणि ज्येष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर शुक्रवारी नाट्यपंढरीत येत आहेत.
शुक्रवारी संमेलनाच्या निमित्ताने सामाजिक विषयांवरील पथनाट्य सादर करण्यात येणार आहेत, तर शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
संमेलनासाठी विश्रामबागेतील कल्पद्रुम क्रीडांगणावर मुख्य व्यासपीठाचे काम पूर्णत्वास आले आहे. याच ठिकाणी शुक्रवारी स्थानिक कलावंतांचे ‘आरंभ ते प्रारंभ’ हे महानाट्य सादर केले जाणार आहे. शनिवारी ‘कलारंग रजनी’ हा कार्यक्रम होणार आहे. यात प्रदीप पटवर्धन, अविनाश नारकर आदी अभिनेते कलागुण सादर करणार आहेत. रविवारी सायंकाळी पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाºयावरची वरात’ हे नाटक सादर होणार असून याचे दिग्दर्शन अध्यक्ष श्रीकांत मोघे यांनी केले आहे.