आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता अक्षय कुमारने शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना पाठवली अनोखी दिवाळी भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- बॉलीवूडचा सुपरस्टार आणि संवेदनशील अभिनेता अक्षयकुमारने 103 शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी 25 हजार रुपयांचा धनादेश आणि मिठाई पाठवून या शहीद पोलिसांच्या कुटुंबियांना दिवाळीची आगळीवेगळी भेट देऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. अक्षयकुमारच्या या सामाजिक उपक्रमाने कोल्हापूरकर सुद्धा भारावून गेले आहेत.
 
दस्तुरखुद्द राज्याचे महसूलमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालेल्या कॉन्स्टेबल दिलीप संकपाळ तसेच लाईन बाजार येथे राहणाऱ्या व कर्तव्य बजावत असताना हृदय विकाराच्याच झटक्याने निधन झालेल्या सुरेश विठ्ठल जाधव यांच्याही घरी अक्षयकुमारची ही सामाजिक उपक्रमाची अनोखी दिवाळी घेऊन गेले. सोबत अक्षयच्या सहीचे पत्र सुद्धा त्यांनी वाचून दाखवले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते उपस्थित होते.
 
अक्षय कुमारचे पत्र
अक्षय कुमारने आपल्या पत्रात या पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांना दीपावलीचा संदेश देताना म्हटले आहे की, आपल्या घरातील शूरवीराने देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. आम्ही सर्व भारतीयांना या सुपुत्राचा सार्थ अभिमान आहे. मला पूर्व कल्पना आहे की या दिवाळीच्या प्रसंगी आपण कुटुंबीय त्यांच्या सानिध्याच्या आणि प्रेमाच्या आठवणींना नक्कीच उजाळा देत असाल. आपल्यावर कोसळलेले दुःख अपार आणि कठोर आहे. मात्र आपण यातून सावरून नव्या वर्षात पदार्पण करावे. अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मी या दीपावलीच्या निमित्त आपल्या घरातील बालकांना मिठाई आणि त्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी छोटीशी भेट देऊ इच्छितो, आपण त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार करावा.ही माझी नम्र विनंती.
सदैव आपल्या ऋणात असणारा आपला अक्षयकुमार
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...