आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापुरात अलर्ट; महालक्ष्मी मंदिराचे दोन दरवाजे बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- अतिरेकी कारवायांचा संभाव्य धोका ओळखून येथील महालक्ष्मी मंदिराचे चारपैकी दोन दरवाजे पूर्वीप्रमाणेच बंद ठेवण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. मुख्य सचिव, पोलिस महासंचालक व कोल्हापूरचे जिल्हा पोलिस प्रमुख विजयसिंह जाधव या बैठकीला उपस्थित होते. आधीही हे दरवाजे बंद होते, परंतु शिवसेना-भाजपने आंदोलन करून ते उघडण्यास भाग पाडले होते. मेटल डिटेक्टरमधूनच प्रवेश देण्याचेही आदेश आहेत.

तिरुपतीप्रमाणे लाडूचा प्रसाद : तिरुपतीप्रमाणेच महालक्ष्मीच्या भक्तांना लाडवाचा प्रसाद देण्याचा निर्णय अन्नछत्र ट्रस्टने घेतला आहे. गाईच्या तुपातील या लाडवांत बेसन, बदाम, काजूगर, बेदाणे, खडीसाखर असेल. येत्या 9 ऑगस्टपासून माफक किमतीत ते भक्तांना दिले जातील.


तिरूपतीसारखाच लाडू प्रसाद मिळणार कोल्हापुरात

कोल्हापूर- भाविकांच्या मागणीनुसार तिरूपतीला जसा लाडू मिळतो तशा लाडवाचा प्रसाद कोल्हापुरात देण्याचा निर्णय महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी ही माहिती दिली.

तिरूपती देवस्थानला ज्या पध्दतीने मोठ्या लाडवाचा प्रसाद दिला जातो. त्याच पध्दतीने कोल्हापुरात प्रसाद द्यावा अशी भाविकांची मागणी होती. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने प्रसादाचे लाडू आजही विक्रीस आहेत. परंतु तिरूपतीसारखे वेगळ्या चवीचे, मोठे लाडू मिळावेत अशी भाविकांची अपेक्षा होती. त्यानुसार भाविकांसाठी कायमस्वरूपी मोफत अन्नछत्र चालवणार्‍या महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्यावतीने माफक किंमतीत गाईच्या तुपातील हे लाडू उपलब्ध करून दिले जाणार आहेत. बेसन, बदाम, काजूगर, बेदाणे, खडी साखरेचा या लाडवामध्ये समावेश असेल. 9 ऑगस्टला महापौर प्रतिभा नाईकनवरे व अन्य पदाधिकाºयांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.