आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत पतीचे मृत्यू प्रमाणपत्र देऊन पेन्शन लाटली, पतीनेच केला बनाव उघड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - पती जिवंत असताना त्याच्या मृत्यूचा दाखला देऊन गेली अडीच वर्षे निराधार पेन्शन घेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील महिलेचा बनाव गुरुवारी उघडकीस आला. पतीच्या जागरूकतेमुळेच हे प्रकरण उजेडात येऊ शकले. रेणुका सुनील जाधव या महिलेविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.

पत्नीशी सातत्याने भांडणे होत असल्याने सुनील बाहेरगावी राहत होता. गोव्यात काही वर्षे काम केल्यानंतर तो चार महिन्यांपूर्वी गडहिंग्लजमध्ये आला. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. घटस्फोटासाठीचा अर्जही न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच संसार कसा चालवायचा या विवंचनेत असलेल्या रेणुकाने पाच वर्षांपूर्वी पती मृत झाल्याची नगरपालिकेत नोंद केली. त्यावरून पतीच्या मृत्यूचा दाखला काढला. त्याआधारेच शासनाच्या निराधारांसाठीच्या पेन्शन योजनेतून महिना ९०० रुपये पेन्शन सुरू करून घेतली. ही माहिती सुनीलला मिळताच त्याने तलाठ्याकडून हयातीचा दाखला घेऊन तहसीलदारांकडे चौकशी केली व रेणुकाने केलेला बनाव उघडकीस आला.