आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले हुशार आहेत, टीव्हीतून बाहेर काढा, नाट्यसंमेलनाध्यक्षा फय्याज यांची खंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी, बेळगाव - सध्याचे पालक इव्हेंट्समध्ये अडकले आहेत. सहा महिन्यांत त्यांना मुलगा महागायक हवा असतो, अशी खंत बोलून दाखवतानाच मुले हुशार आहेत. त्यांना टीव्हीपासून बाजूला काढून शास्त्रीय शिक्षण दिले पाहिजे, असे मत ९५ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फय्याज शेख यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर बोलताना फय्याज यांनी विविध विषयांवर परखड मते मांडली.

सकाळ, दुपार,संध्याकाळ तेच नट
एकच कलाकार सकाळी चित्रपटात दिसतो. दुपारी नाटकात असतो आणि घरी आल्यावर सायंकाळी मालिकेतही दिसतो. हे ओव्हर एक्स्पोजर जरा कमी केले पाहिजे. तेच इव्हेंट्स, तेच विनोदवीर, तीच गाणी, तेच कलावंत हे चित्र बदलावे.

नाट्यगृहे स्वच्छ ठेवा
नाट्यगृह आपले आहे, रसिकांसाठी आहे. बेसिनमध्ये पिचकार्‍या मारून काेपरे घाण करू नका, अशा शब्दांत फय्याज यांनी कलाकारांना स्वच्छतेचीही शिकवण दिली.

"जय महाराष्ट्र' टाळून पवारांचा "नमस्कार'
पायाला दुखापत झाल्याने शरद पवारांनी बसूनच भाषण केले. शेवटी ‘जय हिंद’ म्हणून ते थबकले. ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार तेवढ्यात बेळगावात असल्याचे लक्षात आल्याने ‘नमस्कार’ म्हणून भाषण संपवले.

१५ वर्षांनी सीएम आले
देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री १५ वर्षांनंतर बेळगावात आले. २००० मध्ये साहित्य संमेलनासाठी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आले होते.

रंगकर्मींनाही सुनावले खडे बोल
- ताना घेऊन टाळ्या मिळवणे हे नाट्यसंगीत नव्हे. नव्यांनी एक तरी नाटक करावे.
- नऊवारी नेसून मुली पँट घातल्यासारख्या चालतात. मला याचा खूप त्रास होतो.
- दिवाणखान्यातील नाटके बाहेर पडावीत. मुंबई, पुण्यात मिळते, बाहेर कशाला पडू? हा विचार आता तरी सोडा.
- नसिरुद्दीन शहा, परेश रावल अजून एकपात्री करतात. असे आपल्याकडे का नाही?
- मुलांना उत्तम बालनाट्यसंहिता मिळाव्यात. बालनाट्याला शासनाने अनुदान द्यावे.