आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात महापाैर काँग्रेसचाच, आघाडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे एकहाती नेतृत्व करून २७ जागा निवडून आणणाऱ्या माजी मंत्री सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सुरू केलेले आमदार महादेवराव महाडिक यांचे सर्व प्रयत्न उधळून लावत अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सत्तेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला अाहे. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. ठरल्यानुसार पहिला महापौर काँग्रेसचा व उपमहापौर राष्ट्रवादीचा होणार आहे. अन्य पदांबाबत समन्वयाने निर्णय घेण्यात येणार असल्याचे सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
याआधीही दोन्ही काँग्रेस सत्तेत होत्या; परंतु अाता सतेज पाटील यांना सत्तेची संधी मिळू नये या उद्देशाने राष्ट्रवादीला बरोबर घेण्यासाठी भाजप व महाडिक यांनी प्रयत्न सुरू केले हाेते. मात्र, त्याच वेळी कोल्हापुरात पतंगराव कदम, सतेज पाटील, हसन मुश्रीफ या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठक घेऊन अाघाडी करण्यावर शिक्कामाेर्तब केले. काँग्रेस आणि भाजपने पाठवलेले दोन्ही प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे पाठवले हाेते. मात्र, त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्याचा आदेश दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

चमत्कार घडवून अाणू : पाटील
राजकारणात चमत्कारही हाेत असतात. त्यामुळे अाम्ही अजूनही महापाैरपदावरही दावा साेडलेला नाही. १६ नाेव्हेंबर राेजी महापाैर अामचाच हाेईल, असा दावा ३२ जागा मिळविणाऱ्या भाजप- ताराराणी अाघाडीचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.