आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतिप्रवण करण्यासाठी तणावही महत्त्वाचा, शक्ती आणि क्षमता वाढवतात स्ट्रेस हार्मोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तणाव लाभदायीअसू शकतो असे कोणी ऐकले नसेल. तुम्ही त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर निश्चितच तसे आहे. अमेरिकन मानसशास्त्रीय सर्व्हेनुसार ४० % लोक रात्री झोप येत नसल्याने त्रस्त आहेत. याच्या मुळाशी तणाव आहे. हा तणाव काही ठिकाणी लाभदायी आहे. तणाव नैसर्गिक मानवी प्रतिसाद असतो.
 
एखादे भय समोर असेल तर स्ट्रेस हार्मोन सक्रिय होतात. मात्र हे हार्मोन आपल्याला तत्काळ काही करण्यासाठी कारणीभूत असतात. हृदयाच्या स्पंदनांची गती वाढते. स्नायू ताणले जातात. रक्तदाब वाढतो. श्वसन वेगाने होते. मात्र त्यासोबतच शारीरिक शक्ती आणि क्षमताही वाढते. त्यामुळे एकाग्रता येते. प्रतिसाद वेगाने देण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारे व्यक्ती तणावाचा सामना करण्यास सक्षम होते. 
 
अधिक तणाव असेल तर कुटुंब, मित्र, सहकारी सर्वाधिक मदत करतात. शास्त्रीय संशोधनानुसार सार्वजनिक मदतीमुळे शरीरात हार्मोन स्रवते असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे लोकांमध्ये आपुलकी वाढते. याचा सर्वाधिक लाभ म्हणजे तणावादरम्यान हृदयाच्या पेशींचे झालेले नुकसान यामुळे भरून निघते. अनेक बाबतीत तणाव महत्त्वाचाही असतो. मोठ्या संधींसाठी तुम्हाला तो सजग ठेवतो. थोडा तणाव यशासाठी ऊर्जाही देतो. 
बातम्या आणखी आहेत...