आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andolan Morcha In Kholapur For Maratha Reservation

मराठा आरक्षणासाठी सांगली-कोल्हापूरात रास्ता रोको आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सांगली, कोल्हापुरातील मराठा संघटनांनी सोमवारी सरकारविरोधी रोष व्यक्त केला. मराठा आरक्षण संघर्ष समितीतर्फे कोल्हापूरजवळील पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. एका बसवर दगडफेकही करण्यात आली.


कोल्हापुरात समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी 11 नंतर तावडे हॉटेलच्या परिसरात कार्यकर्ते मोठ्या संख्येने महामार्गावर जमले. या वेळी दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गांधीनगर पोलिसांसह कोल्हापूरहूनही पोलिस कुमक मागवण्यात होती. या वेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. कोडोलीकडे जाणा-या एका बसवरही दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. या वेळी सुरेशदादा पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

सांगलीतही रास्ता रोको, वाहतूक ठप्प- मराठा समाजाला 25 टक्के आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या, या मागणीसाठी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सांगली शहराजवळही रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी या वेळी दिला.