आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिकेत कोथळे खून प्रकरण : सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस कोठडीत मृत्यू झालेला अनिकेत कोथळे. - Divya Marathi
पोलिस कोठडीत मृत्यू झालेला अनिकेत कोथळे.

सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती.

 


अनिकेत कोथळे याच्या पोलिस ठाण्यातील मृत्यू आणि त्यानंतरची सर्व घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र संशयित कामटे याने सीसीटीव्हीमधील हे सर्व फुटेज डिलीट करुन सीसीटीव्ही बंद पाडला होता. या खून प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे होते. मात्र ते डिलीट करण्यात आले. याप्रकरणी ज्या व्यक्तीकडून हे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले. त्या संशयित आरोपीस सीआयडी पथकाने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...