आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिकेतच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न; सीआयडीवर विश्वास नाही, सीबीआय चौकशीची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या अनिकेत कोथळेच्या दोन भावांनी मंगळवारी स्वत: वर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अनिकेतच्या मृत्यूची सीआयडी चौकशी न करता सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह ५ पोलिसांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणात १२ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. अनिकेतची सुपारी देऊन हत्या करण्यात आली, असा आरोप अनिकेतच्या भावाने केला होता. त्याच्या हत्येची सुपारी पोलिसांनाच दिल्याचा दावाही दोन्ही भावांनी केला होता. अनिकेत जिथे कामाला होता, त्या लकी बॅग हाऊसमध्ये महिलांचे अश्लील चित्रीकरण करून त्याच्या सीडी बनवल्या जात होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर अनिकेतने पत्नी आणि भावाला याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काम सोडत असल्याचे सांगत अनिकेतने मालकाकडे एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली होती.   

 

काय आहे अनिकेत कोथळेचा खून प्रकरण?

पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे. याप्रकरणात आतापर्यंत 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...