आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिकेत कोथळे खून प्रकरण; सापडलेला मृतदेह अनिकेतचाच असल्याचे DNA चाचणीत स्पष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली/कोल्हापूर- आंबोली येथे सापडलेला मृतदेह हा अनिकेतचाच असल्याचे डीएनए चाचणीच्या अहवालात स्पष्ट झाले आहेत. सीआयडीचे संजय कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

 

सांगलीच्या पोलिस कोठडीत पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे अनिकेत कोथळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या साथीदारांनी अनिकेत याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे नेऊन जाळला होता. हा खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीआयडीने आंबोली येथून अर्धवट जळलेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला. तसेच यानंतर याच ठिकाणी आणखी दोन मृतदेह आढळून आल्याने, अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाबाबत शंका उपस्थित झाली होती.

 

यानंतर सीआयडीने पहिल्यांदा सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए टेस्ट करण्याचे ठरवत अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांचेही नमुना घेऊन पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात तो मृतदेह अनिकेतचा असल्याचे नमूद झाले असल्याची माहिती सीआयडीचे संजय कुमार यांनी दिली आहे.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...