आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताच हवी, आंदोलनांतून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत - अंजली दमानिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - उपोषण, आंदोलनातून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, त्यासाठी सत्तेचाच मार्ग योग्य आहे, असा साक्षात्कार आम आदमी पक्षाच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांना झाला.

‘आप‘च्या उमेदवार समिना खान यांच्या प्रचारासाठी मंगळवारी दमानिया सांगलीत आल्या होत्या. ‘आम आदमी हा केवळ एक पक्ष नाही तर ती एक लोकचळवळ आहे. ‘आप’ने दिल्लीत सत्ता मिळताच महिनाभरातच 12 आश्वासनांची पूर्तता केली होती. जनलोकपालच्या मुद्दय़ावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला नाही, म्हणून सत्ता सोडल्याचे त्या म्हणाल्या.

मेधा पाटकरांचे दुर्लक्ष
मुंबईत मेधा पाटकर उपोषणाला बसल्या, त्यांची सत्ताधार्‍यांनी विचारपूसही केली नाही, याउलट तिकडे मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले तर मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम हेलिकॉप्टरने त्यांच्याशी चर्चा करायला गेले. ही परिस्थिती आहे. त्यामुळे आता लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आंदोलने करायची नाहीत, तर सत्तेचा मार्ग अवलंबवावा लागेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले.