आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Annasaheb Jadhav Selected For RSS Western Maharashtra

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत संघचालकपदी जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रांत संघचालकपदी नानासाहेब अण्णासाहेब जाधव यांची तीन वर्षांसाठी निवड झाली.
संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताची बैठक नुकतीच पुण्यात झाली. संघाचे क्षेत्र प्रचारक रवी जोशी यावेळी उपस्थित होते. नानासाहेब जाधव हे मूळचे बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील आहेत. त्यांनी कृषी अभियांत्रिकीमध्ये एम. टेक. केले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून ते शास्त्रज्ञ म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
शाळेचे मुख्य शिक्षक ते प्रांत संघचालक असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे. नगर जिल्हा सहकार्यवाह, पुणे विभाग कार्यवाह, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सन २०११ मध्ये ते प्रांताचे संघचालक होते. प्रांत संघचालक दादा सहाणे यांच्या निधनानंतर प्रांत संघचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आता जाधव यांची प्रांत संघचालकपदी निवड झाली आहे.