आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Magical Law Very Soon Introduced , Say Dr. Narendra Dabholkar

जादूटोणा विरोधी कायदा लवकर होईल, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - जादूटोणा विरोधातील कायदा व्हावा यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुकूल आहेत. वारकरी मंडळींपैकी केवळ एका गटाचा या कायद्याला विरोध आहे. मात्र लवकरच हा कायदा होईल, अशी आम्हाला आशा वाटते, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी गुरुवारी केले.


पत्रकारांशी बोलताना डॉ.दाभोलकर म्हणाले, की नोव्हेंबर 2011 पासून आम्ही यासंदर्भात शेवटच्या टप्प्यात आलो असताना शासन तसेच वारकरी मंडळींनी समवाद साधत आहे. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांच्या बरोबरही आम्ही संवाद साधला. त्यांना हा कायदा मंजूरआहे. तसेच वारकरी मंडळींनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाही विचारात घेतल्या आहेत, त्यांची संख्या सुमारे 20 आहे. अशा परिस्थितीत हे विधेयक मंजूर न करणे किंवा आमच्याशी चर्चा झाली नाही, असे म्हणणे अयोग्य आहे. बुधवारी माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी चर्चा झाली. हे चौघेही कायद्याबाबत सकारात्मक असल्याचा
दावा दाभोलकर यांनी केला.


आधी मंत्रिमंडळात निर्णय
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्य शासनातर्फे अंधश्रध्दा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मांडणार आहे. सदर विधेयक अघोरी कृत्याविरोधातील कायदा असून त्याबाबत आधी मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल. वारकरी प्रतिनिधींसोबत नागपूर अधिवेशनात चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी सुचविल्याप्रमाणे विधेयकाच्या मसुद्यात बदल केले असून सुधारित मसुदा वारक-यांना 6-7 महिन्यांपूर्वीच देण्यात आला आहे.