आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षापासून अश्विनी गोरे बेपत्ता; PI कुरुंदरकरनेच घातपात केल्याचा कुटुंबियांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- मुंबईच्या कळंबोलीमधून सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत एक महिला पोलिस अधिकारी गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता झाली आहे. अश्विनी राजू गोरे असे या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. वारंवार तक्रार करूनही या प्रकरणाचा तपास करण्यास दस्तुरखुद्द पोलिसच टाळाटाळ करत आहेत, असा खळबळजनक आरोप या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पतीने आणि वडिलांनी केला आहे.

 

पोलिस ठाण्यात सिनिअर पीआय म्हणून कार्यरत असणाऱ्या अभय कुरुंदरकर या पोलिस अधिकाऱ्यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा घातपात केल्याचा संशयसुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या काळ्या करतुतीचा चेहरा पुढे आला आहे.

 

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी  15 एप्रिल 2016 पासून  मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. मात्र त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचेच सिनिअर पीआय अभय कुरुंदकर यांनीच तिला प्रथम प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिच्या घरच्यांना हे प्रकरण समजल्यानंतर ती त्याच्या प्रेमाला दाद देवू न शकल्याने तिचा घातपात केला असा आरोप या महिलेचे कुटुंबीय करत आहेत. या महिला अधिकाऱ्याला बेपत्ता करण्यात पीआय कुरुंदकर यांचाच हात आहे म्हणून अश्विनीच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु पोलिस या गुन्ह्याचा तपासच करत नाहीत आणि याबाबत कोणतेच सहकार्य करत नसल्याचा आरोपही  अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा... पन्हाळा ( जि. कोल्हापूर) तालुक्यातील आळते या गावच्या महत्त्वकांक्षी या तरुणीविषयी...

बातम्या आणखी आहेत...