आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मूक मोर्चांची माहिती देण्यासाठी ‘अॅप’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेल्हापूर - कोपर्डी प्रकरण, अॅट्रॉसिटी रद्द करणे, मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांवर राज्यात िनघत असलेल्या लाखोंच्या मराठा मूक मोर्चांची माहिती यापुढे अॅपवर मिळणार आहे. कोल्हापूरच्या एका सॉफ्टवेअर कंपनीने ‘ईएक्सवायनाऊ’ नावाने अॅपची निर्मिती केली असून आतापर्यंत पाचशे जणांनी अॅप डाऊनलाेड केला आहे.

राज्यात सध्या लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहेत. अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने निघत असलेल्या या मोर्चांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. अॅपबाबत माहिती देताना ईएक्सवायनाऊ कंपनीचे संस्थापक विनायक भोगन म्हणाले, येत्या काही दिवसांत राज्यातील उर्वरित जिल्ह्यांत निघणाऱ्या मूकमोर्चांसाठी या अॅपचा वापर करता येईल. १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे मूकमोर्चा निघणार आहे. या वेळी यात काही आवश्यक बदल करण्यात येतील. त्यानंतर मुंबईत निघणाऱ्या महामोर्चासाठी हे अॅप अतिशय उपयुक्त असेल.

दसरा चाैकात वाॅररूम
कोल्हापुरातील दसरा चौकात वॉररूम तयार करण्यात आली आहे. मोर्चासाठी वापरण्यात येत असलेले मार्ग, वेगवेगळ्या गावांतील लोकांशी संवाद, आवश्यक परवानग्या आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती अॅपवर देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील मूकमोर्चासाठी अवघे १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तयारी करण्यास वेळ कमी पडत असल्याचेही ते म्हणाले. अॅप विकसित करण्यात कंपनी आणि इतर सहकाऱ्यांनी स्वेच्छेने यात सहभाग घेतला आहे.
‘अॅप’द्वारे माेर्चेकऱ्यांना मदतीचीही साेय
अॅप डाऊनलोड केल्यानंतर संबंधिताला नोंदणी करावी लागेल. त्यानंतर मूकमोर्चांसंबंधी फोटो, व्हिडिओ आणि इतर आवश्यक माहिती अॅपवरून डाऊनलोड करता येईल. तसेच यावर आपले मतही नोंदवता येईल. मूकमोर्चादरम्यान एखाद्या व्यक्तीला काही अडचण आली तर वॉररूममध्ये काम पाहत असलेले स्वयंसेवक तत्काळ मदत करतील.
बातम्या आणखी आहेत...