आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात दुष्काळग्रस्तांच्या मदतीला लष्करही !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- केवळ मराठवाडा विदर्भच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनाही यंदा दुष्काळाचे चटके बसत अाहेत. अशाच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नेर तलावात साचलेला गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले अाहे.

विशेष म्हणजे सेवानिवृत्त लष्करी जवान गावकऱ्यांनी हाती घेतलेल्या या कामाला भारतीय लष्करातील जवानांचीही मदत मिळत अाहे.

१८७२ साली ब्रिटिशांनी उभारलेल्या नेर तलावातील गाळ अाजपावेताे काढण्यात अाला नव्हता. जय जवान जय किसान प्रतिष्ठान आणि ग्रीन थंब संस्थेच्या वतीने हे काम हाती घेण्यात अाले.
या दोन्ही संस्थांच्या मदतीला लष्करातील नायक दर्शनखान ,लांसनायक गुरुजित सिंग, हवालदार सचिन गायकवाड हे धावून अाले अाहेत. बॉम्बे सेपर्स विभागाचा एक डोजर हे अद्ययावत यंत्रही त्यांनी गाळ काढण्यासाठी अाणले अाहे. या तलावातला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना माेफत देण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी तो आपल्या वाहनातून न्यावा अापल्या शेतीचा कस वाढवावा, असे अावाहन जिल्हाधिकारी मुद्गल यांनी केले अाहे.