आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashok Patil Murder Case : Main Suspect Worker Of Satej Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशोक पाटील खून प्रकरण : सतेज पाटील समर्थकावर खूनाचा संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - काँग्रेस आमदार महादेव महाडिक यांचे समर्थक अशोक पाटील यांच्या खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना दुस-या दिवशीपर्यंत यश आले नव्हते. कॉँग्रेसचेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीच हा खून केल्याचा आरोप पाटील यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे मंत्र्यांचे समर्थक यांचा कार्यकर्ता दिलीप जाधव याच्या नावावर संशय होत आहे.

बुधवारी दुपारी अज्ञात मारेक-यांनी पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. सतेज पाटील यांनीच सुपारी देऊन हे हत्याकांड घडवले असल्याचा आरोप करत शेकडो कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या दिला होता. अखेर रात्री 2 च्या सुमारास पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली, यात राज्यमंत्र्यांचा कार्यकर्ता दिलीप जाधव याच्यावर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, सतेज पाटील यांनी मात्र आपल्यावर राजकीय द्वेषातून आरोप होत असल्याचे म्हटले आहे.