आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assassin Fire Some Rounds On Govind Pansare And His Wife In Kolhapur

SHAME SHAME: पुरोगामी महाराष्ट्रातील या नेत्यांचे विचार गोळ्या झाडून थांबवण्याचा झाला प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- डाव्या चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडण्यात आल्या. पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा गोळ्या मारुन विचारांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. पण असे आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेले नाही. यापूर्वीही अनेकदा अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडल्या आहेत. गोळ्या झाडून विचारांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणाकोणावर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्यात आला, याचा आम्ही घेतलेला आढावा.
गोविंद पानसरे आज सकाळी पत्नीसह फिरायला जात होते. यावेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात पानसरे गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सायंकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीची नेमकी माहिती समजणार आहे. त्यांची प्रकृती स्थीर पण गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, महाराष्ट्रातील कोणकोणत्या पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांवर गोळ्या झाडून विचारांची लढाई थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला...