आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: सदाभाऊंनी सुरू केलेल्या शेतकरी बाजारात शेतकऱ्याचाच \'बाजार\', बी.जी.पाटील यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे भाजपच्या सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना त्याच्या पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून संत सावता माळी शेतकरी बाजार संपूर्ण राज्यभर सुरू केले. मात्र या सावता माळी शेतकरी बाजारात फायदा होण्याऐवजी शेतकऱ्याचाच बाजार होऊ लागला आहे, असा सणसणीत आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी.पाटील (काका) यांनी कोल्हापुरात केला.

पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, याच बाजारात शेतकऱ्यांच्या शिवारात पिकवलेला माल ग्राहकाला तिपटीने मिळू लागलाय. त्यामुळे शेतकरी नाडला गेलाय. लुटला जातोय. हे सावता माळी शेतकरी बाजार सरकारचं धादांत खूळ आहे. कारण ज्या बाजारात शेतकऱ्याला कांदा साडेतीन रुपयाला खरेदी केला जातो. आणि ग्राहकापर्यंत जाईपर्यंत तोच कांदा 10 ते 15 रुपयांनी विक्री केली जात आहे.

धड शेतकऱ्यांना फायदा नाही आणि धड ग्राहकांना फायदा नाही अशी अवस्था आहे. हा शेतकरी बाजार म्हणजे सावता बाजार झालाय. आणि ही भुलथाप आहे .असा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी.पाटील यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...