आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त अभियंता पाटीलची संपत्ती सहा कोटींहून जास्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोकण पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब भाऊसाहेब पाटील यांच्याकडे सहा कोटींपेक्षा अधिक किमतीची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले अाहे. एसीबीचे पथक सलग दुसऱ्या दिवशी त्यांच्या पुण्यासह इतर शहरांतील मालमत्तेची झडती घेत हाेते, यातून अाणखी काही मालमत्ता उघड हाेण्याची शक्यता अाहे.

कोकण पाटबंधारे विभागात गैरव्यवहार झाल्यानंतर एसीबीने या महामंडळाच्या बड्या अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. गेले काही महिने पाटील यांच्याबद्दलची माहिती गोळा करून याआधी कोल्हापुरातील रुईकर काॅलनी परिसरातील महाडिक वसाहतीतील त्यांच्या बंगल्यावर दोन वेळा छापा टाकण्यात आला होता. संपूर्ण चौकशीनंतर ज्ञात उत्पन्नापेक्षा सुमारे ३५ टक्के म्हणजे दीड कोटी रुपयांची जादा मालमत्ता पाटील यांच्याकडे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने गुरुवारी सकाळपासून पाटील यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या
मालमत्तांवर छापासत्र सुरू केले आहे.

पाटील यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला अाहे. एसीबी सोलापूरचे तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त, उपअधीक्षक जी. एस. जवादवाड यांनी त्यांची उघड चौकशी केली असता पाटील व कुटुंबीयांच्या नावे ज्ञात एक कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारपासून संपत्तीची झडती घेतली जात अाहे. पाटील, त्यांची पत्नी शुभलक्ष्मी, मुलगे उत्कर्ष व हर्षप्रतीक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला अाहे.

सांगली, पुण्यात संपत्ती
पाटील यांनी कोल्हापूर येथे सहा, सोलापूरमध्ये एक, पुण्यात चार मालमत्ता खरेदी केल्या अाहेत. सांगली येथील घर, फ्लॅट, प्लाॅट, शेतजमीन याचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ५ कोटी ९१ लाख ९९ हजारांची अतिरिक्त मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले असून पुण्यातील मालमत्तेची झडती अजूनही सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...