आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Battis Shirala A Village Known For Its Nagpanchami Festivities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिराळय़ात जिवंत नागांचीच पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - उच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत राहून नागपंचमी साजरी करण्याचे आदेश दिलेले असतानाही सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे रविवारी घरोघरी परंपरेनुसारच जिवंत नागांची पूजा करण्यात आली.

शिराळा येथे गेल्या काही वर्षांपासून नागांची जिवंत पूजा करण्याची प्रथा पडली. याला सांगलीतील निसर्ग प्रतिष्ठानच्या वतीने 2000 मध्ये डॉ. रवीद्र व्होरा, अजित पाटील आणि प्रा. सुरेश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचा अद्याप अंतिम निकाल झालेला नाही. दरम्यान, उत्सव सुरू राहावा म्हणून न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत राहून नागपंचमी साजरी करावी, असा आदेश दिला होता. दरवर्षी याच आदेशानुसार नागपंचमी साजरी करण्याचे सांगितले जाते, तरीही घरोघरी जिवंत नागांची पूजा केली जाते.