आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Belgaon BJP MLA Sanjay Patil Supporter Bitten Two Person

बेळगाव: प्रेमविवाहात साक्षीदार झालेल्या तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - प्रेमविवाहात साक्षीदार म्हणून उभ्या राहिलेल्या दोन तरुणांना विवस्त्र करून भाजप कार्यकर्त्याने बेदम मारहाण केल्याची घटना बेळगावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांचा सहायक सुरेश घाटगे याच्यासह सहा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कुदनूर येथील प्रेमीयुगुलाने नोव्हेंबर रोजी पळून जाऊन लग्न केले हाेते. दोघे वेगवेगळ्या जातींचे असल्याने मुलीच्या नातेवाइकांनी लग्नाला विरोध केला. मुलीचा काका सुरेश घाटगे याने लग्नातील साक्षीदार असलेल्या अनिल नागरदळे आणि आणखी एका तरुणाला बेळगावजवळील बेळुंदगी या गावात 14 नोव्हेंबर रोजी रात्री बोलावून घेतले दोघांना विवस्त्र करून बेदम मारहाण केली.