आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगावच्‍या महापालिकेवर पुन्‍हा मराठी झेंडा, सरिता पाटील महापौरपदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव - येथे महापालिकेवर सलग तिसऱ्यांदा बेळगाव विकास आघाडीचा झेंडा फडकला असून, मराठी भाषिक गटाच्‍या सरिता पाटील यांच्‍या गळ्यात महापौरपदाची माळ पडली आहे. विकास आघाडीचेच संजय शिंदे उपमहापौर झाले.

पाटील यांना मिळाले 32 मतं
सरिता पाटील यांच्‍या विरोधात कन्नड-उर्दू गटाच्या जयश्री माळगी होत्‍या. पाटील यांना 32 तर जयश्री यांना 25 मतं पडली. मराठी भाषिक नगरसेवकांमध्‍ये कुठलीही फूट पडू नये, म्‍हणून काही दिवसांपासून सर्वच नगरसेवक कोकणात गुप्‍त स्‍थळी होते. शुक्रवारी सकाळी ते थेट मतदानासाठी आले.