आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Belgaum Violence By Kannad People News In Marathi

बेळगावात कन्नडीगांचा धुमाकूळ, येळ्ळूरमध्ये तणाव वाढला, नारायण गौडाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेळगाव- कन्नड रक्षण वेदिका या संघटनेचे हजारो कार्यकर्ते बेळगावात दाखल झाले असून त्यांचा बेबंद धिंगाणा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे येळ्ळूर येथेही तणावाचे वातावरण असून दोन्ही शहरांमध्ये मोठा पोलिसफाटा तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी संघटनेचा अध्यक्ष नारायण गौडा याला अटक करण्यात आली आहे.
कानडी पोलिसांनी येळ्ळूरमधील मराठी बांधवांना मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी कानडी पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने पुरावे सादर करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, काल शिवसेनेचे वरिष्ठ नेते दिवाकर रावते यांनी बेळगावला पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी विरोध केला. पत्रकार परिषद रद्द करायला लावली. त्यांना येळ्ळूरमध्ये जाऊ दिले नाही. उलट पोलिसांच्या गाड्या त्यांच्या ताफ्याभोवती लावून त्यांना शहराबाहेर काढण्यात आले होते.
यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कन्नडीगांनी मोठा धिंगाणा घातला आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स झळकावून मराठी बांधवांच्या प्रयत्नांना विरोध करण्यात येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तरीही कन्नड भाषिक कार्यकर्ते खुलेआम फिरताना दिसत आहेत.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते रामदास कदम म्हणाले, की मराठी भाषकांवर होत असलेले हल्ले लगेच थांबायला हवेत. नाहीतर नाक दाबून तोंड उघडावे लागेल. आमचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.