आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबाबाई मंदिरातील पुजारी हटावो आंदोलनाला पाठिंबा, गरज पडल्‍यास रस्‍त्‍यावर उतरु- तृप्‍ती देसाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- आंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या पुजारी हटावो आंदोलनाला भूमाता ब्रिगेडचा पूर्ण पाठिंबा असेल आणि वेळ पडल्यास भूमाता ब्रिगेड या आंदोलनात उतरेल, अशी माहिती ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिव्य मराठी वेब टीमला मंगळवारी दिली.

त्या म्हणाल्या की, आम्ही अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले. मात्र त्यावेळी  आम्‍ही केवळ चुडीदार नेसून गाभाऱ्यात जाणार म्‍हणून भाडोत्री गुंड आणून आम्हाला मारहाण करण्यात आली. पुजाऱ्यांनी माझा गळा पकडला, शिवीगाळ केली. आता त्याच पुजाऱ्यानी देवीला घागरा चोळी नेसवून नवीन वाद समोर आणला आहे.

यावेळी तृप्‍ती देसाई यांनी गरज पडल्‍यास कोल्‍हापूरमध्‍ये रस्‍त्‍यावर उतरू, असे सांगितले. त्‍या म्‍हणाल्‍या, 'आमचा घागरा चोळीला विरोध नाही. ड्रेसकोडवरुन आम्‍हाला विरोध करण्याचा पुजा-यांनाही अधिकार नाही. मात्र मंदिरात पूजा-यांची जी मनमानी सुरू आहे, ती संपली पाहिजे. यासाठी गरज पडल्‍यास आम्‍ही रस्‍त्‍यावर उतरु.' पुजाऱ्यांना हटवून तात्काळ पंढरपूर पॅटर्न कोल्हापूर मध्ये लागू करावा अशी मागणी देसाई यांनी राज्य सरकार आणि जिल्हाधिका-यांकडे यावेळी केली.  
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, काय म्‍हणाल्‍या तृप्‍ती देसाई..व्हिडिओ...


 
 
 
बातम्या आणखी आहेत...