आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत ‘एचसीएल’ कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - सांगली- मिरज- कुपवाड महापालिकेच्या सर्व विभागांचे संगणकीकरण आणि सर्व दाखले देण्यासाठी नेमलेल्या एचसीएल कंपनीच्या कार्यालयाची मंगळवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले पाच जण महापालिकेच्या नवीन इमारतीत असलेल्या एचसीएलच्या कार्यालयासमोर आले. त्यातील तिघे कार्यालयात घुसले आणि त्यांनी कॉम्प्युटरची तोडफोड केली. यात दोन मॉनिटर व काउंटरवरील काचा फुटल्या. हल्लेखोरांनी खुच्र्यांचीही तोडफोड केली. या हल्ल्यात कंपनीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. या कंपनीकडून सामान्यांची लूट होत असल्याचा आरोप करून त्यांनी ही तोडफोड केली.