आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरणे रखडवल्यामुळेच शेतकरी आत्महत्या!, काँग्रेस-राष्ट्रवादीवर भाजपचे थेट शरसंधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार करून सर्व धरणांची कामे बंद करून टाकली. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे, असा थेट आरोप केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केला. राज्य भाजपच्या तीन दिवसांच्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

‘मध्य प्रदेशचा कृषी विकास दर २४ टक्के असल्याने शिवराजसिंह चौहान यांचा गौरव होतो. गुजरातचा दरही १४ टक्के आहे. मग ‘जाणत्या राजा’च्या नेतृत्वाखालील सरकारचा कृषिविकास दर कमी का?, असा प्रश्न गडकरींनी शरद पवारांचे नाव न घेता उपस्थित केला. तासाभराच्या भाषणात त्यांनी जनधन योजना, विमा योजना, स्वच्छ भारत यासारख्या योजनांची उदाहरणे देऊन देशाचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास मोदी सरकारने घेतल्याचे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट, पंकजा मुंडे, विष्णू सावरा, विद्या ठाकूर अादी उपस्थित होते. ‘शेतीमधील उत्पन्न वाढवायचे, युवकांना रोजगार द्यायचा, व त्या माध्यमातून शहराकडे जाणारे लोंढे थांबवायचे अशा विविध भूमिका घेऊन केंद्र शासन काम करत असल्याचे गडकरींनी सांगितले. महाराष्ट्रात जलयुक्त शिवारसारख्या चांगल्या योजना राबवल्याबद्दल त्यांनी गौरवोद‌्गार काढले.

सोशल मीडियाद्वारे कामे घराघरांत पोहोचवा : मुख्यमंत्री
‘काँग्रेसने केवळ सत्तेचे दलाल निर्माण केले, सत्तेचे लचके तोडण्याचे काम केले. त्यामुळेच जनतेने आपल्या हाती सत्ता दिली आहे. गेल्या सात महिन्यात आपल्या सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवा, त्यासाठी व्हाटसअपचे ग्रुप करा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना केले. दुष्काळी जनतेच्या मदतीसाठी आम्ही ४ हजार कोटी रुपये अॅडव्हान्स काढला आणि शेतकऱ्यांना पैसे दिले. ‘त्यांनी’ मात्र हेलिकॉप्टर घेण्यासाठी अॅडव्हान्स काढला होता,’ अशी टीका त्यांनी आघाडी सरकारवर केली.
मी करोडपती नव्हे तर ‘लोकपती’ : दानवे
कोल्हापूर - ‘आतापर्यंत २३ निवडणुका लढवल्या आणि २२ जिंकल्या. पक्षानं माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती मी प्रामाणिकपणाने पार पाडली. गेल्यावर्षी याच दिवशी माझं केंद्रीय मंत्रिपद नक्की झालं आणि आता वर्षभराने याच दिवशी मी अधिकृतपणे प्रदेशाध्यक्ष झालो. राज्यात १ कोटींहून अधिक भाजपचे सदस्य झाल्याने मला ‘करोडपती अध्यक्ष’ म्हणतात. मात्र मी ‘करोडपती, लक्षपती नाही तर लोकपती आहे. लोकांच्या प्रेमावरच इतकी वर्षे काम केले असून अाताही संधीचे साेने करीन,’ अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
तीन महिन्यांपूर्वी दानवे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरी रविवारी राज्य कार्यकारिणीत त्यांना अधिकृत पदभार देण्यात अाला. मावळते प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला हात उंचावून सदस्यांनी पाठिंबा दिला.

दानवेंच्या खास मराठवाडा स्टाईल भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दानवे दाद दिली. ‘ग्रामपंचायत सदस्य ते खासदार, मंत्री अशी अनेक पदे अाजवर मिळाली. केंद्रात मंत्रीपदासाठी माझं ही नाव चर्चेत होत. त्यामुळे ५०० कार्यकर्ते थेट दिल्लीला आले. मला आलं टेन्शन. ह्यांची सोय कुठं करू म्हणून नाही. तर आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही तर काय. याचं टेन्शन हाेतं. रात्री फडणवीसांचा फाेन अाला. त्यांनी नाव फायनल झाल्याचं सांगितलं. मी म्हणालाे ‘खरंच का. घरच्यांना सांगू का.. कारण एेनवेळी नाही म्हटले तर कार्यकर्त्यांना काही तरी सांगता येईल, पण ‘तिला’ कसं सांगायचं...’ असा प्रश्न हाेता. मात्र नंतर माेदींचा फाेन अाला अन‌् मंित्रपद मिळालं.’
मुख्यमंत्र्यांकडून गौरव
दानवे यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाची माहिती देणारं एखादं सत्र ठेवलं पाहिजे. त्यांची वाटचाल ही कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी ठरणारी आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे साेपविण्यापूर्वी दानवे यांचा गौरव केला.
बातम्या आणखी आहेत...