आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस सरकार आंधळं-बहिरं असल्याचं सोंग घेतंय, चुकीच्या गोष्टींविरोधात बोलणारच - पटोले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- आमचं भाजप सरकार आंधळं आणि बहिरं आहे, त्यामुळे सरकारच्या चुकीच्या भूमिकेविरोधात मला नेहमीच बोलावे लागते. चुकीच्या कामाविरोधात मी बोलतच राहणार, पक्षाने काय कारवाई करायची ती करु दे मला काहीच फरक पडत नाही, असे भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी वक्तव्य करत स्वपक्षावर तोफ डागली.
 
खासदार नाना पटोले सध्या देशभर विविध भागात फिरत आहेत तसेच वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सोमवारी कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी पटोले आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याच सरकारवर निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये सुसूत्रता नाही. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत की चंद्रकांत पाटील? हे देखील समजतं नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा करायच्या असतात ते कधी कधी चंद्रकांत पाटील करतात, असे सांगत फडणवीस सरकारमध्ये कोणताही समन्वय नाही अशी बोचरी टीका पटोले यांनी केली.
 
राज्यातील नेते व मंत्री वेगवेगळ्या मुद्यांवर बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी लगाम घालावा असे सांगत गिरीश महाजनांच्या दारू व तंबाखूजन्य पदार्थांना महिलांची नावे द्यायला सांगणा-या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. यापूर्वी सदाभाऊ खोत यांच्या ऊसदरांबाबत केलेल्या  'हा काही रतन खत्रीचा मटका आहे काय' आणि 'राज्यात 10 लाख बोगस शेतकरी' असल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
 
राज्यात गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. हे सर्व सरकारला माहित असतानाही फडणवीस सरकारने आधळं व बहिरं झाल्याचे सोंग घेतलं आहे. फडणवीस सरकारने शेतक-यांना कर्जमाफी वाईट पद्धतीने देत आहे. याविरोधात मी बोलतच राहणार, पक्षाने काय कारवाई करायची ते करू देत, असे निर्भीड भूमिका मांडली.
बातम्या आणखी आहेत...