आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांचा ‘आरटीआय’मध्ये समावेश योग्यच; गोपिनाथ मुंडेंचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- ‘सर्वच राजकीय पक्ष त्यांचे आर्थिक व्यवहार माहितीच्या अधिकार कक्षेच्या अंतर्गत आणले जात असतील तर मी त्याचे स्वागत करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी दिली. भाजपचे वरिष्ठ नेते या निर्णयाला विरोध करत असताना मुंडेंनी मात्र त्याचे स्वागत केले आहे.

बुधवारी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या आयपीएलमधील फिक्सिंगबाबत ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या काळात ‘आयपीएल’ सुरू झाले. त्यांच्याच काळात ललित मोदींवर कारवाई झाली. जिथे घोटाळे तिथे शरद पवार हे एक समीकरण झाले आहे. राज्यातील आघाडी सरकार अशाच महाघोटाळ्यांनी बनलेले आहे, त्यामुळे अधिक काही बोलायला नको असा टोलाही त्यांनी लगावला.

मनसेबाबत ठरले नाही : महायुतीत आम्ही शेतकरी संघटनेलाही बरोबर घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. मनसेबाबत मात्र अद्याप काही ठरवले नसल्याचे ते म्हणाले.