आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MAL Suresh Halvankar News In Marathi, Kolhapur

वीज चोरीप्रकरण: भाजपचे आमदार सुरेश हाळवणकरांची आमदारकी टिकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- वीज चोरीच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात व दोन वर्षे शिक्षा झालेले इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हाळवणकर यांची आमदारकी वाचली असून पुढील विधानसभा निवडणूक लढवण्याचाही त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

हाळवणकर आणि त्यांचे भाऊ यांच्या कारखान्यावर 6 सप्टेंबर 2008 रोजी वीज वितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून त्यांनी केलेली वीजचोरी पकडण्यात आली होती. मे महिन्यामध्ये याप्रकरणी इचलकरंजी येथील सत्र न्यायालयाने हाळवणकर बंधूंना दोषी ठरवून त्यांना 20 लाख रुपये भरण्याचे तसेच दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही दिली होती. या निकालामुळे नवीन लोकप्रतिनिधी कायद्यानुसार हाळवणकर यांची आमदारकीही रद्द होणार होती, तसेच शिक्षा भोगल्यानंतर पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास ते अपात्र ठरणार होते. त्यादृष्टीने विधानसभा अध्यक्ष व राज्यपालांच्या कार्यालयाकडून कारवाईच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या. मात्र सोमवारी उच्च न्यायालयाने हाळवणकरांच्या शिक्षेला स्थगिती दिली, त्यामुळे त्यांची आमदारकी तूर्त वाचली आहे.

पुरावेच सापडले नाहीत
भरारी पथकाने छापा टाकला होता, त्याआधीच आमदार हाळवणकर यांनी हा कारखाना लीव्ह अँड लायसन्स तत्त्वावर भावाला चालवण्यासाठी दिला होता. तसेच कारखान्याचे कामकाज आमदार हाळवणकर पाहत होते याचा पुरावा न्यायालयात सादर केलेला नव्हता. या आधारावर शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.