आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज चोरीप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश हळवणकर यांना सक्तमजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळवणकर यांना कोल्हापूर सत्र न्यायालयाने वीज चोरीप्रकरणी तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या घटनेमुळे हळवणकर यांना चांगलाच झटका बसला असून दोन वर्षापेक्षा जास्त सक्तमजुरीची शिक्षा झाल्याने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत. असे असले तरी वरच्या कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असला तरी त्यांना आतातरी शिक्षा भोगावीच लागणार आहे.
आमदार सुरेश हळवणकर व त्यांचे बंधू महादेव हळवणकर यांचा इचलकरंजीतील कोरोली आणि शहापूर येथे यंत्रमागाची फॅक्टरी आहेत. याच फॅक्टरीसाठी या बंधूंनी 2009 मध्ये चोरीची वीज घेतल्याचे वीज महामंडळाच्या लक्षात आले. त्यामुळे या दोघांच्या विरोधात महामंडळाने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून हा खटला स्थानिक कोर्टात सुरु होता. याचबरोबर 2009 साली विधानसभा निवडणुकीत हळवणकरांनी घेतलेल्या चोरीच्या विजेचा प्रचाराचा मुद्दा बनला होता. तरीही हळवणकरांनी कल्लापा आवाडे यांच्या मुलाचा पराभव केला होता.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी 5-6 महिन्याचा काळ बाकी राहिला असताना हळवणकरांची आमदारकी रद्द होणार आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास तो अपात्र ठरणार आहेत.