आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Sena In Kolhapur Municipal Corporation Election

कोल्हापूर मनपासाठी भाजप-सेना आमने सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या अागामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले अाहे. काॅंग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेल्या ताराराणी आघाडीशी युती करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून या दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये एकमेकांचा पंचनामा करण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसून येते.

गेली २० वर्षे या महापालिकेत भाजप - शिवसेना युतीने लढतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेला युती तुटल्यानंतर आता महापालिकेसाठीही शिवसेनेला सोबत घेण्याऐवजी पालकंमत्री तथा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महाडिकांशी जवळीक करणे पसंत केले. तशी घाेषणाच त्यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप, ताराराणी आघाडीला शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधी गटही मदत करण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे राष्ट्रवादी, जनसुराज्य व काॅंग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांचा गट एकत्र येऊ शकताे.

अाघाडी कशासाठी?
काॅंग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांनी २० वर्षांपूर्वी ताराराणी आघाडीची स्थापना केली. प्रत्येक प्रभागात उमेदवारांना मदत करायची आणि विजयी होईल तो आपला अशी भूमिका घेत त्यांनी १५ वर्षे सत्ता राखली. दरम्यान, सत्तेत एकत्र असूनही शिवसेना शहरप्रमुख व आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना वारंवार लक्ष्य केल्यानंतर आता क्षीरसागर यांनाच अडचणीत आणण्यासाठी भाजपने महाडिकांशी अाघाडीची खेळी खेळली अाहे. महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक हे सध्या भाजपचे अामदार अाहेत.