आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन,२२ ते २४ मे रोजी होणार कार्यकारिणीची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक व अधिवेशनाची तयारी कोल्हापुरात जोरात सुरू असून प्रदेश संघटन सरचिटणीस रवी भुसारी आणि सह संघटन सरचिटणीस सुनील कर्जतकर यांनी नुकतीच या तयारीची पाहणी केली. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

२२, २३ व २४ मे या तीन दिवशी कोल्हापुरात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक व अधिवेशन घेण्यात येणार आहे. याआधीच्या नियोजनानुसार राज्यातील सर्व नेत्यांबरोबरच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या वेळी उपस्थित राहणार आहेत. ज्या ठिकाणी अधिवेशन होणार आहे त्या पेटाळा येथील जागेची पाहणी करण्यात आली. तर रेसिडेन्सी क्लब येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे.

शहा किंवा गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. याआधी २०१० मध्ये अशीच कार्यकारिणीची बैठक कोल्हापुरात झाली होती. सहा महिन्यांवर महापालिकेची निवडणूक असल्याने वातावरण निर्मिती करण्याचाही हा भाजपचा प्रयत्न आहे. या वेळी भाजपचे पदाधिकारी बाबा देसाई, महेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारीही या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.